Saturday, 26 September 2015

दहिवाली पनीर सब्झी - Dahiwale Paneer


वेळ: ३०-३५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
२०० ग्राम पनीर
२ लवंगा, २ मिरी दाणे, १ लहान दालीचीनीचा तुकडा (किंवा ३ चिमटी दालचिनी पावडर)
१ मध्यम कांदा, बारीक चिरून (१/४ कपपेक्षा थोडा जास्त)
१ टिस्पून आलं
१ टिस्पून लसूण पेस्ट
१ कप टॉमेटो प्युरी (कच्च्या टॉमेटोची प्युरी)
६ टेस्पून काजूची पेस्ट (३ टेस्पून मगजबी + ३ टेस्पून काजू)
१/४ कप दही + १ टिस्पून गरम मसाला + १ टिस्पून आलेलसूण पेस्ट + १/४ टिस्पून चाट मसाला + दिड टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून चिरलेली पुदिना पाने
२ टेस्पून मलई
४ ते ५ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर


कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात अख्खे मसाले परतावे. त्यावर चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा परतला की आलेलसूण पेस्ट परतावी.
२) टॉमेटो प्युरी घालून त्याचा कच्चा वास जाईस्तोवर मंद आचेवर शिजू द्यावे (साधारण १० मिनिटे). काजू पेस्ट घालून ३-४ मिनिटे उकळवावे. अधून मधून तळापासून ढवळावे. पनीर घालावे.
३) आता दह्याचे मिश्रण आणि मीठ घालावे. मंद आचेवर २-४ मिनिटे शिजवावे. आता पुदिना पाने, मलई आणि साखर घालावी. झाकण ठेवून ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
सर्व्ह करताना किसलेल्या पनीरने सजवावे आणि सर्व्ह करावे.

Related Posts:

  • दहिवाली पनीर सब्झी - Dahiwale Paneer वेळ: ३०-३५ मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: २०० ग्राम पनीर २ लवंगा, २ मिरी दाणे, १ लहान दालीचीनीचा तुकडा (किंवा ३ चिमटी दालचिनी पावडर) १ मध्यम कांदा, बारीक चिरून (१/४ कपपेक्षा थोडा जास्त) १ टिस्पून आलं १ टिस्पून लसूण पे… Read More
  • चिली पनीर - Chilli Paneer, Chilli Paneer Recipe in Hindi, how to make chilli paneer recipe in hindi, Chilli Paneer Vegetarian Recipe Chilli Paneer Vegetarian Recipe: साहित्य:१५० ग्राम पनीर ६-७ सुक्या लाल मिरच्या पनीर तळण्यासाठी तेल १ टेस्पून आले पेस्ट १ टेस्पून लसूण पेस्ट १ टेस्पून टोमॅटो पेस्ट १/२ कप बारीक उभा चिरलेला कांदा १/४ कप उभी चिरलेली भोपळी म… Read More
  • पनीर वेजिटेबल पिझ्झा - Paneer Vegetable Pizza Paneer Vegetable Pizza: साहित्य: पिझ्झा बेस:- इथे क्लिक करा पिझ्झा सॉससाठी:- इथे क्लिक करा टॉपिंगसाठी: पनीर ७५ ते १०० ग्राम (साधारण १२-१५ लहान तुकडे) १ टेस्पून दही १/२ टिस्पून तंदूरी मसाला १/२ टिस्पून आलेलसूण पेस… Read More
  • Shahi Paneer Recipe | How to make shahi paneer in Hindi | Indian Recipes in Hindi | शाही पनीर - Shahi Paneer Indian Recipes in Hindi | शाही पनीर - Shahi Paneer: पनीर की  सभी प्रकार की सब्जियां, ज्यादातर लोग पसन्द करते हैं लेकिन शाही पनीर बहुत ही स्वादिष्ट सब्जी हैं, हर पार्टी की शान है, शाही पनीर सब्जी को आप अपने मेहमानों क… Read More
  • पनीर पालक मेथी - Methi Palak Paneer Subzi Recipe | Palak Methi Paneer - Indian Cooking Guide Palak Methi Paneer - Indian Cooking Guide: पालक का हरा साग, ताजा मेथी की पत्ते और पनीर को मिलाकर बनाई गई पनीर पालक मेथी की सूखी सब्जी स्वाद में तो लाजबाव होती ही है मिनरल और प्रोटीन से भी भरपूर होती है. यदि इन्हें कम मसा… Read More

0 comments:

Post a Comment