Saturday, 26 September 2015

चिली पनीर - Chilli Paneer, Chilli Paneer Recipe in Hindi, how to make chilli paneer recipe in hindi, Chilli Paneer Vegetarian Recipe

Chilli Paneer Vegetarian Recipe:


साहित्य:१५० ग्राम पनीर
६-७ सुक्या लाल मिरच्या
पनीर तळण्यासाठी तेल
१ टेस्पून आले पेस्ट
१ टेस्पून लसूण पेस्ट
१ टेस्पून टोमॅटो पेस्ट
१/२ कप बारीक उभा चिरलेला कांदा
१/४ कप उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ कप बारीक चिरलेला पाती कांदा
२ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर (टीप २)
२ टीस्पून सोया सॉस
१ टिस्पून व्हिनेगर
मिठ
१/२ टिस्पून साखर
१/२ टिस्पून मिरपूड


कृती:::::चिली सॉस::::
१) सुक्या लाल मिरच्या तोडून घ्याव्यात. लहान पातेल्यात पाउण कप पाणी गरम करावे, त्यात तोडलेल्या मिरच्या घालाव्यात. २ मिनीटे उकळावे. गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवून द्यावे. मिरच्या नरम झाल्या कि त्यातील पाणी एका वाटीत काढून ठेवावे. मिरच्यांची मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी. टोमॅटो पेस्ट आणि मिरच्यांची पेस्ट एकत्र करावी. १ टेस्पून तेलावर हि पेस्ट १ मिनीटभर परतून घ्यावी. नंतर दुसर्‍या भांड्यात काढून ठेवावी.
::::पनीर::::
१) पनीरचे १ इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. एका वाडग्यात मिठ, १/२ टिस्पून मिरपूड आणि केलेल्या आलेलसणीच्या पेस्टपैकी एकेक चिमटी पेस्ट घालून असे मिश्रण करून घ्यावे. हे मिश्रण पनीरच्या तुकड्यांना हलक्या हाताने लावावे.
२) कॉर्न फ्लोअर एका बोलमध्ये घेऊन त्यात ४-५ चमचे पाणी घेऊन मध्यमसर पेस्ट बनवून घ्यावी. एकीकडे तळण्यासाठी तेल गरम करावे. जरा छोटी कढई वापरावी म्हणजे तेल कमी वापरले जाईल. पनीरचे मिठ, मिरपूड आणि आलेलसूण लावलेले तुकडे कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून सोनेरी रंग येईस्तोवर तळून काढावे. पेपर टॉवेलवर काढून ठेवावे.
३) उरलेल्या कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमधील १ चमचा पेस्ट आणि मिरच्यांचे १/२ कप पाणी एकत्र करावे.
::::चिली पनीर::::
१) पनीरचे तळलेले तुकडे, आणि परतलेली मिरची-टोमॅटो पेस्ट तयार ठेवावी. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ टिस्पून तेल तापवावे. आलेलसूण पेस्ट परतावी, कांदा परतावा. कांदा पूर्ण परतू नये. नंतर भोपळी मिरची परतावी. तयार केलेला चिली सॉस घालून परतावे. व्हिनेगर आणि सोया सॉस घालावा. मिरच्यांचे पाणी आणि कॉर्न फ्लोअरची पेस्ट एकत्र केलेले मिश्रण घालावे. १/२ टिस्पून साखर घालावी. मिश्रण जरा आटू द्यावे, आटले कि तळलेले पनीर घालावे. निट मिक्स करावे. बारीक केलेला पाती कांदा वरून भुरभुरावा. गरम गरम सर्व्ह करावे.
टीप:
१) पनीरला कॉर्न फ्लोअरचे कोटिंग करताना पेस्ट खूप दाट असू नये. पातळसरच असावे.
२) पनीर चिली बनवताना कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्न स्टार्च यापैकी आपण काहीही वापरू शकता.

0 comments:

Post a Comment